सुषमा अंधारे - आप्पासाहेब जाधव यांच्यातील वाद आर्थिक देवाण घेवाणीतुन - सचिन मुळूक
सुषमा अंधारे - आप्पासाहेब जाधव यांच्यातील वाद आर्थिक देवाण घेवाणीतुन - सचिन मुळूक
बीड दि.19 ( प्रतिनिधी ) सुषमाताई अंधारे यांना त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केली. सदरील घटना अतिशय निंदनीय असून त्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हिडीओ क्लिपचा आधार घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नवले यांनी केली.
बीडमध्ये आज दुपारी शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली.यावेळी प्रा. नवले , सचिन मुळूक उपस्थित होते.
सुषमा अंधारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी संस्कार शिबिर घेऊन राजकारणात कसे वागावे हे सांगावे. भविष्यात ही तसदी त्यांना घ्यावी लागेल घडलेल्या घटनेचा जाहीर धिक्कार करतो, निंदा करतो आणि महिलांच्या संदर्भात असे अनुचित प्रकार होणार नाहीत याची दक्षता उद्धव ठाकरे यांनी घ्यावी असा सल्ला प्रा. नवले यांनी दिला. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले , काल जो काही गोंधळ झाला.महाप्रबोधन यात्रेसाठी अधिकारी व इतरांवर दबाव टाकून कार्यक्रमासाठी निधी गोळा केला. या देवाण घेवाणवरून अंधारे आणि जाधब यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर मारहानीत झाले, यावेळी ठाकरे गटातील पदाधिकारी यांनी जाधव यांना बेदम मारहाण केल्याचा दावा मुळूक यांनी केला. ही मारहाण आर्थिक देवाण घेवाणीतुन झाला असून त्यांचे जिल्हाप्रमुख किती संस्कारी आहेत हे काल लोकांसमोर आले. यावरून हा पक्ष कीटक संवेदनशील आहे हे देखील समोर आले. आशा असंस्कारी लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही असे सांगून जाधव यांना शिंदे गटात स्थान नाही हे देखील मुळूक यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना वेठ बिगारासारखी वागणूक दिली जाते हे अनेकदा समोर आलेले आहे असेही मुळूक यावेळी म्हणाले.
Add new comment