बैल गाडीसह तळ्यात उधळला ; आजोबासह नातवाचा बुडून मृत्यू

बैल गाडीसह तळ्यात उधळला ; आजोबासह नातवाचा बुडून मृत्यू
आणखी एक नातू गंभीर
बीड दि.22 ( प्रतिनिधी ) बैलाला तळ्यावर पाणी पाजत असतांना बैल अचानक घाबरला आणि काही कळण्याच्या आत बैल गाडीसह तळ्यात उधळला. बैलगाडीत असलेले आजोबा आणि दोन नातूही पाण्यात ओढले गेले. यावेळी एक नातू बाजूला फेकला गेला तर आजोबा आणि अन्य एका नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कासारी बोडखा ( ता. धारूर ) येथे आज दुपारी घडली.
धारूर तालुक्यातील सय्यद कबीर बाशुमिया ( वय 65 वर्ष ) राहणार कासारी बोडखा हे नातू अमजद सय्यद अखिल ( वय 12 ) आणि सय्यद अत्तु ( वय 15) हे बैलगाडीत बसून शेतात जात होते. त्यांनी गावाशेजारील तलावाजवळ बैलगाडी नेली. त्याठिकाणी जुंपलेला गाडीसह बैल पाणी पीत असतांना अचानक घाबरून तो बैल थेट तळ्यातील पाण्याच्या दिशेने उधळला. यावेळी गाडीतील तिघे देखील तळ्यात ओढले गेले. या दुर्दैवी गटनेते आजोबा सय्यद कबीर ( 65 ) आणि नातू सय्यद अमजद ( 12 ) या दोघांचा मृत्यू झाला तर दुसरा नातू सय्यद अत्तू ( 15 ) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Add new comment