माजलगावच्या रोड रॉबरी प्रकरणात फिर्यादीच निघाले आरोपी!
पिदाडा भाऊ दारू पिण्यात पैसे खर्च करील म्हणून केला घटनेचा बनाव.
राज गायकवाड माजलगाव.
माजलगाव जवळ वर्दळीच्या तेलगाव रस्त्यावर रोड रॉबरी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी दुपारी घडली होती.परंतु या प्रकरणात फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे.दारू पिदाडा भाऊ दारू पिऊन पैसे खर्च करून टाकेल या कारणाने हा बनाव करण्यात आला,आसे फिर्यादी/ आरोपीचे म्हणणे आहे.या प्रकरणात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट देऊन जलद ग्रामीण पोलिसांमार्फत तपास करून तासाभरातच बनाव उघडा पाडून लुटमार प्रकरणाचा पर्दाफाश केला.
तालुक्यातील लोनगाव येथील गजानन बाजीराव कोळसे व जनार्दन कोळसे यांनी माजलगाव तेलगाव रस्त्यावर तीन लोकांनी गाडीवर येऊन आम्हाला लुटमार केल्याची फिर्याद दिली होती.या रोड रॉबरी प्रकरण्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती.सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवला.तपासात त्वरीत दिशा पकडत बँकेसह रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना दाल में कुछ काला है असा संशय आला. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीची उलट तपासणी केली.त्यावेळी फिर्यादी त.. त..त..!म..म..म!!करू लागला.यामुळे पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच रोड रॉबरीचा बनाव केला असल्याचे फिर्यादीने कबूल केले.हा सर्व बनाव प्रकार आपण आपला पिदाडा भाऊ दारू पिण्यात पैसे खर्च करेल म्हणून केला,असे कबूल केले. दरम्यान काही रक्कम आरोपी फिर्यादीने आपल्या मामेभाऊ राम हरी प्रभाकर पटाईत मार्फत मुंबईला पाठवले असल्याची पोलिसांना सांगितले.दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी गजानन बाजीराव कोळसे,जनार्धन कोळसे,रामहरी प्रभाकर पटाईत विरुद्ध भादवि कलम 181 नुसार खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती,या प्रकरणात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,सपोअ रश्मिता राव, सपोनि निलेश विधाते,पीएसआय विजय जोंनवल,पीएसआय दाभाडे, एएसआय बळवंत,पोना रवि राठोड,पोना मोरे,पोसि विलास खाडे,व एलसीबीची सर्व टीम यांनी तासाभरात रचलेला बनाव उघडा पाडून प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात यश आले.
Add new comment