बीड जिल्ह्यातील किराणासह अत्यावश्यक सेवा उद्यापासून सकाळी 7 ते 11 सुरू राहणार

बीड दि.31 (प्रतिनिधी ) राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दि.15 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी   नवीन आदेश काढले आहेत. सदर आदेशानुसार आता जिल्ह्यात दि.1 जून पासून अत्यावश्यक सेवतील किराणा, भाजीपाला, फळविक्री, चिकन मटण , बेकरी विक्रीची सकाळी रोज सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील व शनिवारी , रविवारी पूर्ण बंद राहतील असे आदेशात म्हटले आहे

दिनांक 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे .
१. दिनांक 1 जून रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील . Lite : contawpat desium सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्यूटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा सामळो , तसाचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझस , मास्क , वैद्यकिय उपकरण , कच्चा माल यूनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपराक्त दिवशी चाल राहणार नाहीत .
२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यात सुरु राहील
.

३. दि .01/06/2021 ते 15/06/2021या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना ( किराणा दकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे रकाने , खेकरी संबंधित इ ) केवळ सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत चाल राहतील व शनिवार , रविवार पर्णपणे बंद राहतील .

४. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील ,

५. जिल्ह्यातील सर्व बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज दि .३१,०५.२०२१ पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे पूर्णवेळ सूरु राहतील .
६. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५ % उपस्थितीत सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . )

७. लसीकरणा करीता ४५ वावरील ज्या व्यक्तीना मेसेज आला आहे . आरोग्य विभागाचे पत्र आले आहे . त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल , ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल . ) कृषी व्यवसायाशी संबंधित शि - बियाणे , खते , औषधे गांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि - बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल . तसेच कृषि विक्रेत्यांना / शेतकन्यांना बि बियाणे , खते , औषधे विक्रीस खरेदीस पूर्णवेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२,०० वाजेपर्यंत परवानगी असेल , ( शनिवार व रविवार सुध्दा विहीत वेळेत चालू राहतील . )

९ . कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच सुरु राहतील
. १०. नरेगाची कामे सुरु राहतील , त्या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सनिटायझर या य कोविड -१ ९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल ,

११. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच लाभाथ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील . ( राशनसाठी जाणा - या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . )
१२. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माविकी अनुशपया पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील ,

१३. दुकानांना पुरवठा केल्या जाणान्या वस्तूंच्या वाहतूकीवर निबंध असणार नाहीत , परंतु दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर प्राहकांना विक्री करता येणार नाही . या नियमाचा भंग केल्यास सदर दुकान कोरोना साथ अधिसूचना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल दिनांक १२.०५.२०२१ च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील .

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.