रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नोंदणीची गरज नाही , आता रुग्णालयाकडून ईमेलद्वारे होणार मागणी
बीड दि.30 ( प्रतिनिधी ) रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आता उद्या दि.1 मे पासून आयटीआयमध्ये नोंदणी करायची गरज नाही. कारण प्रशासनाने संबंधित रुग्णालयांनाच इमेल द्वारे मागणी नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास दूर होणार आहे.
जिल्हाधिकारी , बीड यांच्या निर्देशानुसार बीड शहरातील सर्व कोविड रुग्णालयांचे डॉक्टर्स ची बैठक घेण्यात आली . बैठकीत निर्णय घेण्यात आले कि , खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसीवीर आणण्यास पाठवू नये व आपल्या रुग्णालयात रुग्णास लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शन ची आवश्यकता हे स्वतः रूग्णालया मार्फत करण्यात यावी जेणे करून रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी होईल व रेमडेसेवीर इंजेक्शन गरजू रुग्णांना रुग्णालयातच उपलब्ध होईल जिल्हाधिकारी कार्यालय , बीड व अन्न व औषध प्रशासन ( म . राज्य ) , बीड यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्शभूमीवर माहिती देण्यात येते कि , बीड शहरातील सर्व खाजगी कोविड -१ ९ रूग्णालय हे रेमडीसीवर इंजेक्शन साठी ची आवश्यकता इमेल द्वारे कळवतील , असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निर्गमित करण्यात आले . तरी बीड शहरातील सर्व खासगी रुग्णालया मध्ये प्रवेश घेतलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुचित करण्यात येते कि , दि . १/५/२०२१ पासून आय.टी.आय कोविड सेंटर , बीड येथे रेमडेसेवीर इंजेक्शन साठी अर्ज भरण्याची गरज नाही व त्यांची मागणी त्यांचे रुग्णालयाने इमेल द्वारे कळवावी लागणार असल्याचे औषध प्रशासन सहायक आयुक्त डोईफोडे यांनी आदेशात म्हटले आहे.
Add new comment