लसीचा डोस घेण्यापुर्वी रक्तदान करा - कृष्णा फरताळे
बीड (प्रतिनिधी);- देशभरात 1 मे पासुन 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. एकदा लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता येत नाही. म्हणुन ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीचा डोस घेण्या अगोदर रक्तदान करावे आणि मगच लस घ्यावी. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही असे आवाहन स्व.राहुल भैय्या फरताळे युवा प्रतिष्ठाणचे व युवासेनेचे कृष्णा फरताळे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने प्रशासनाकडुन वारंवार रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले जात आहे. आता दि.1 मे पासुन 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्व नागरीकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढच्या 60 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी लसीचा डोस घेण्याअगोदर रक्तदान करावे आणि मगच लस घ्यावी असे आवाहन स्व.राहुल भैय्या फरताळे युवा प्रतिष्ठाणचे व युवासेनेचे कृष्णा फरताळे यांनी केले आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. लसीकरण झाल्यानंतर 60 दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे त्याआधीच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन स्व.राहुल भैय्या फरताळे युवा प्रतिष्ठाणचे व युवासेनेचे कृष्णा फरताळे यांनी केले आहे.
Add new comment