जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण , राज्याच्या गाईड लाईन्स नुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
बीड दि.5 ( प्रतिनिधी ) राज्याच्या गाईड लाईन्स नुसार जिल्हा प्रशासनाने आज आदेश काढले आहेत. ब्रेक द चैन अंतर्गत ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्याच आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा, किराणा दुकान, दूध, बेकरी , मिठाई खाद्य दुकाने, भाजीपाला या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार आहेत असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाने कालच लॉकडाऊन शिथिल केला मात्र आजचे आदेश राज्याच्या गाईड लाईन्स नुसारच आहेत. त्यामुळे उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. सदरील निर्बंध दि.30 एप्रिल पर्यंत राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. व्यापाऱ्यांनी फोनकरून याबाबत विचारणा केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी हे स्पष्ट केले आहे. दरम्यान आधीच दहा दिवसाचा लॉकडाऊन झाला त्यात आता पुन्हा 25 दिवस असेच काढायचे म्हटल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहेत.
Add new comment