बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन मागे - जिल्हाधिकारी
बीड दि.4 ( प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी आज मध्यरात्री पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. उद्यापासून लॉकडाऊन उठविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. दहा दिवसांचा लॉकडाऊन काळातील निर्बंध मागे घेण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी जगताप यांनी काढले आहेत. मात्र नियम पाळणे बंधनकारक केले आहे.सर्व शाळा , कोचिंग बंद असणार असून दहावी ,बारावीचे वर्ग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. लग्नासाठी 50 व्यक्तीला परवानगी असेल मात्र त्यांना कोरोना टेस्ट करणे आवश्यक असेल असे आदेशात म्हटले आहे.
सर्व सिनेमा हॉल मॉल्स , सभागृहे आणि रेस्टॉरंटस् बंद राहतील , सदर कालावधीत ( सकाळी 07.00 ते सायंकाळी 08.00 ) रेस्टॉरंट मधून होम डिलीव्हरी व पार्सल सुविधा देणेस परवानगी असेल .जिल्ह्यातील फक्त चहा विक्री करणाऱ्या चहा टपरी व पान टपरी धारकांना त्यांच्या दुकानासमोर सहा फुटांचे माकाग करुन सामाजिक अंतर राखुन मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच विक्री करता येऊ शकेल . सहा फुटांचे अंतर राखले जात नसल्यास तसेच दुकानावर मास्क नसलेले ग्राहक आढळल्यास संबंधीत हे रु . 500 / - दंड / सिल करण्याच्या कारवाईस पात्र राहतील . 7 ) जिल्ह्यातील भाजी विक्रेते / फळ विक्रेते / दुकानदार यांनी अॅन्टीजन / आरटीपीसीआर तपासणी केल्याचे निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र तपासणी वेळी सोबत असणे आवश्यक आहे . तपासणी दरम्यान संबंधीताकडे निगेटीक असल्याचे प्रमाणपत्र नसेल तर संबंधीत हे रु . 500 / - दंड / सिल करण्याच्या कारवाईस पात्र राहतील ,राज्य सरकारने आज लागू केलेले कडक निर्बंध जिल्ह्यात लागू असतील असेही जिल्हाधिकारी जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.
Add new comment