बीड जिल्ह्यातील शाळा दि. 23 नोव्हेंबरपासूनच मात्र दोन टप्प्यात सुरू होणार
बीड जिल्ह्यातील शाळा दि. 23 नोव्हेंबरपासूनच मात्र दोन टप्प्यात सुरू होणार
बीड दि .२१ ( प्रतिनिधी ). राज्य शासनाच्या दि .१० नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार दि. २३ नोव्हेंबर पासून इयत्ता ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे . बीड जिल्हयात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण ७६८ शाळा असून ६६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत . ज्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड -१९ संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली आहे , त्याच शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू होणार आहेत. आजपर्यंत २६२७ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे. चाचणी संबंधित काम दिनांक २४ नोव्हेबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . उर्वरित शाळा दुसऱ्या टप्प्यात दि .२५ नोव्हेंबर २०२० पासून सुरु होतील . सर्व शाळांनी शासन परिपत्रक दि .१० नोव्हेबर २०२० मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे . ज्या शाळांतील कर्मचाऱ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे , त्या शाळांची यादी दि .२२ नोव्हेंबर पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असेल अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी कळविली आहे.
Add new comment