अल्पवयीन प्रेमयुगलांची आत्महात्या
तीन दिवसापासुन दोघेही गायब होते
बीड प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील माटेगाव शिवारातील भाट आंतरवली येथील एका विहीरीमध्ये मंगळवार दिनांक (१) सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मृतदेह तरंगताना आढळुन आले.सदरील दोन मृतदेह विहिरीत तरंगताना दिसताच विहीर मालक सुधाकर चव्हाण यांनी या बाबत चकलांबा ठाण्यास माहिती कळवली आसुन सदरील घटनेची माहिती कळताच चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व पोलीस काॅन्सटेबल अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थाच्या साह्याने मृतदेह विहीरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला व दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापुर येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्रात दाखल करून दि१ सप्टेंबर रोजी दुपारी १२वा सुमारास दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन केले आहेत . मयत शुभम कापसे वय (१७ ) रा.भाटअंतरवाली व कावेरी खंदारे वय (१६) वर्षे रा.पाथरवाला खु हल्ली मुक्काम माटेगाव असे विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांचे नाव आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती आशिकी हे मयत दोघेही गेल्या तीन दिवसापासुन घरातुन निघुन जाऊन गायब असल्याचे दिसुन आले आहे त्याचबरोबर हे दोघे मावसभाऊ बहीन असल्याचे समोर येत आहे कावेरी राजेंद्र खंदारे आपल्या मामाच्या गावात माटेगाव येथे काही दिवसापासुन राहण्यास आली असता तिस विवाहासाठी पाहुने येणार होते त्या कारणापासुन हे दोघेही घरातुन निघुन गेले होते शुभम रोहिदास कापसे तेव्हापासुन गायब आहे याबाबददोघाच्या घरच्या नी आदयापर्यंत पोलीसात का ?कळवले नाही अन्य नातेवाईकाकडे शोध घेतला का नाही याबाबदतरी बातमी लिहुपर्यंत कळले नाही या घटनेने या परीसरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे सदर घटनेची चकलांबा पोलीस ठाण्यात आकस मातघटनेची नोंद झाली आहे
Add new comment