बीड शहरासह परळी, अंबाजोगाई ,आष्टी व केजमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन
बीड दि.9 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव वाढ झाली आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री बारापासून बीड, शहरासह परळी, अंबाजोगाई ,आष्टी आणि केज शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी काढले आहेत. बीड शहरासह अंबाजोगाई परळी केज आष्टी या शहरांमध्ये दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री बारापासून म्हणजेच दिनांक अकरा व बारा ऑगस्ट मधील रात्री 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार असे आदेशात म्हटले आहे. यासंबंधीची नियमावली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केली आहे. दिनांक आठ व नऊ ऑगस्ट रोजी ज्या दुकानदारांची तपासणी झालेली आहे त्यांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुकाने उघडण्यास हरकत नाही असेही आदेशात म्हटले आहे त्याचबरोबर यापुढे कोरोना पॉझिटिव रुग्णांना कोणतेही लक्षणें नसतील तर त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून आणि त्यांना त्यांच्या घरात विलग करण्याची व्यवस्था समाधानकारकपणे होऊ शकेल याची खात्री केल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरण परवानगी देण्यात येईल मात्र त्यांच्याकडून त्याविषयीचे लेखी शपथ पत्र सादर करणे आवश्यक आहे असेही आदेशात म्हटले आहे.
Add new comment