बीड जिल्ह्यातील 17 पॉझिटिव्ह कुठले वाचा

बीड आजचे 17 पॉझिटिव्ह कुठले आहेत वाचा 

बीड दि.8 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज बुधवारी 262 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 96 स्वॅबसह अन्य रुग्णालयातील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 263 पैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत. 238 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7अनिर्णित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णाचा आकडा वाढू लागला आहे. 
दरम्यान, एकाचवेळी 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून नागरिकांनो आता तरी खतरा ओळखा आणि काळजी घ्या. तोंडाला मास्क वापरा , सोशल डिस्टसिंग पाळा, गर्दी करू नका आणि गर्दीत जावू नका. प्रशासनाचे नियम पाळा आणि स्वतःसह कुटुंबियांची व इतरांची काळजी घ्या. 

कोविड-१९ दिनांक ०८/ जुलै २०२० आज १७ पॉझिटिव्ह, आजचे स्वॅब -२६२ निगेटिव्ह - २३८, अनिर्णित

अंबाजोगाई 3 - ३ वर्षीय महिला, १५ व १३ वर्षीय पुरुष 

(एस.बी आय परळी कर्मचा-यांचे कुटुंबिय रा शिक्षक कॉलनी, मोरेवाडी)

परळी 6 - ४५ वर्षीय पुरुष (एसबीआय बँक कर्मचारी), परळी शहर

३३ वर्षीय पुरुष (एसबीआय परळी कर्मचारी), परळी शहर

७१ व २ वर्षीय पुरुष (एसबीआय कर्मचा-याचे कुटुंबीय), परळी शहर

४६ वर्षीय पुरुष (एसबीआय बॅकेचा ग्राहक),परळी शहर

२३ वर्षीय पुरुष (एसबीआय बँकेचा ग्राहक, रा दादाहरी वडगाव),

गेवराई - २६ वर्षीय महिला ( ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह सहवासीत), गेवराई शहर

२८ वर्षीय पुरुष (पुणे हुन आलेला रा केकतपांगरी)

बीड 6 - 
६८ वर्षीय पुरुष (स्टेट बैंक कॉलनी परवाना नगर बीड), बीड शहर

४३ वर्षीय पुरुष (मोमिनपुरा, मक्का चौक), बीड शहर

३० वर्षीय पुरुष (विद्यानगर पूर्व), बीड शहर

८३ वर्षीय स्त्री (गोविंदनगर, बीड) बीड शहर

५५ वर्षीय पुरुष (साक्षाळपिंप्री),

३० वर्षीय पुरुष (वंजारवाडी),

बीड तालुक्यातील रुग्णांपैकी ३ रुग्ण हे बीड शहरातील मेगासर्वेतुन आढळलेले आहेत. अशी महिती प्रशासनाने दिली आहे. 

 

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.