बीड जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालये 31 जुलै पर्यंत बंद - दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
बीड जिल्ह्यातील सर्व शाळा , महाविद्यालये 31 जुलैपर्यंत बंदच
बीड दि.3 ( सिटीझन ) जिल्ह्यात 9 , 10 वी आणि 12 वीचे वर्ग दि.6 जुलै 2020 पासून सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाने काढले होते. मात्र महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन कालावधी दि.31 जुलै पर्यंत वाढविल्यामुळे बीड जिल्हातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दि.31 जुलै 2020 पर्यंत बंद राहतील असे आदेश आज दि.3 जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अजय बहिर व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश खटावकर यांनी संयुक्तरित्या काढले आहेत.
बीड जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी यांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहुन ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे स्वतःचे ज्ञान वाढविणे, शैक्षणिक व कार्यालयीन काम इत्यादी कामकाज करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. माहिला शिक्षिका,मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, ह्रदयविकार इत्यादी सारखे गंभीर आजार असलेले व 55 वर्षावरील पुरुष शिक्षकांना शाळेमध्ये न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वर्फ फ्रॉम होमची सवलत देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अजय बहिर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश खटावकर यांनी संयुक्तरित्या काढले आहेत.
Add new comment