लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील सर्व 36 रिपोर्ट निगेटिव्ह
बीड (प्रतिनिधी) कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज गुरुवारी (दि.18) बीड जिल्ह्यातील 36 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 24, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 6, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून 1, गेवराई उप जिल्हा रुग्णालय 3 व अन्य 2 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Add new comment