बीड: धक्का , आजचे 2 पॉझिटिव्ह
बीड दि.15 ( सिटीझन ) बीड जिल्हयातील आज सोमवारी एकूण 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आज 2 पॉझिटिव्ह तर 66 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दोन्ही रुग्ण बीड शहरातील असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. दोन्ही पूर्वीच्या बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील असावेत असा अंदाज आहे.
कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते.जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, सी. सी. सी. बीड 41, उपजिल्हारुग्णालय परळी 01 व अन्य असे एकूण 68 स्वॅबचा समावेश होता.68 स्वॅबपैकी 2 पॉझिटिव्ह तर 66 निगेटिव्ह आले आहेत.
■ कोविड 19-बीड अपडेट - 15/जून ■
◆ आज पाठविलेले स्वॅब - 68
◆ निगेटिव्ह अहवाल - 66
◆◆ पॉजिटिव्ह अहवाल - 02
1 - झमझम कॉलनी, बीड (पुरूष वय 34 वर्षे)
1 - मसरत नगर, बीड (मुलगा वय १३ वर्षे)
सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment