बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना
मुंबई ( प्रतिनिधी ) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दि.8 जून अंबाजोगाई येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचेही उदघाटन केले होते.
राज्यात याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. परळी येथील एक महिला दि .5 जून रोजी औरंगाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. याच महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात ना.मुंडे आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अजून स्पष्ट नाही. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही सर्वांना आवाहन केले आहे , पालकमंत्री मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे.कागदपत्रे किंवा अन्य बाबींच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाला कळवावे असे आवाहन बीड जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Add new comment