बीड जिल्ह्यात आता आणखी 6 पॉझिटिव्ह ; दिवसभरात 8 पेशंट वाढले
बीड दि.26 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज पाठवण्यात आलेल्या 30 जणांच्या स्वब पैकी 28 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कालच्या प्रलंबित 7 पैकी दुपारी 2 पॉझिटिव्ह आढळले होते आणि आता 6 असे आज दिवसभरात तब्बल 8 रुग्ण वाढले आहेत. आता जिल्ह्यात 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातून गेलेले 4 आणि परळी येथून गेलेले 2 असे एकूण 6 जणांच्या स्वबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. इतर 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 प्रलंबित आहेत.
■■ कोविड 19 - अहवाल दि.26 मे ■■
बीड जिल्हयातील आज एकूण ३० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले सदर अहवाल प्राप्त झाले आहेत.
पाॅझिटीव्ह अहवाल--06
निगेटीव्ह अहवाल--22*
प्रलंबित अहवाल--02
कालचे प्रलंबित मात्र आज पॉझिटिव्ह - 2 ( बीड - दिलीप नगर )
■आज आढळलेले रुग्ण पुढील गावातील■
हाळंब तालुका परळी--2
बारगजवाडी तालुका शिरूर--2
कारेगाव तालुका पाटोदा--1
वाहली तालुका पाटोदा --1
सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment