जामखेड : आमदार असावा तर रोहित पवारांसारखा ! ; पुन्हा केली भरीव मदत

जामखेड दि.8 ( सिटीझन ) राज्यात गरजेनुसार लॉकडाऊनचा कालावधी जसा जसा वाढला तसा-तसा वेळेनुसार टप्प्याटप्प्याने मतदारसंघाला मदतीचा हात देणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या दात्रुत्वाचे अनेक पैलू राज्याने पाहिले आहेत.मतदारसंघाला कुटुंब आणि तेवढीच महत्वाची जबाबदारीही समजणाऱ्या आ.रोहित पवारांनी गरजू,मजुर,भुमीहीन लोकांना मदतीचा हात देऊन कित्त्येक कुटुंबांची भुक शमवली आहे.
         आता पुन्हा एकदा मतदारसंघाला केलेल्या भरीव मदतीने त्यांनी आपला मानवधर्म सिद्ध केला आहे.कर्जत-जामखेडसाठी तब्बल १५ ट्रक आटा आणि साखर टप्प्याटप्प्याने पोहोच करण्यात येत आहे.'कोरोनाशी लढूना' या मोहीमेला राज्यभरातील कानाकोपऱ्यात नेऊन कोरोना वॉरीयर्सना आणि लाखो कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा देणाऱ्या आमदार पवारांची सामाजिक बांधिलकी मतदारसंघातील तब्बल ३३ हजार कुटुंबांना दिलासा देणार आहे.
'उपाशी पोटी कोणतीही लढाई लढली जाऊ शकत नाही असे ठामपणे सांगणाऱ्या आ.पवारांच्या दात्रुत्वातुन लॉकडाऊनच्या काळात अनेकवेळा कसलाही दिखावा न करता,फोटोसेशन न करता, लॉकडाऊनचे शासकीय नियम पाळून जीवनावश्यक तसेच आरोग्यबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
      दरम्यान जामखेड येथे कोरोनाचे अधिक रुग्ण आढळल्याने शहराला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले असुन तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा प्रशासनामार्फत पुरवठा केला जात आहे.या भागातील नागरिकांची अधिक काळजी घेऊन मोठ्या प्रमाणात ही मदत प्रशासनाच्या मदतीने त्यांना दिली जाणार आहे.ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.रुग्णांच्या कायम संपर्कात राहून क्वॉरंटाईन केलेल्यांवरही आ.पवारांचा वॉच आहे.
      लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन मतदारसंघात ५ ट्रक गहू व तुरडाळ, ४ ट्रक कांदा-बटाटा,लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर पुन्हा ८ ट्रक कांदा-बटाटा मतदारसंघाच्या स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता.सॅनीटायझरचा तुटवडा लक्षात घेऊन बारामती ॲग्रोच्या माध्यमातुन सॅनीटायझरची निर्मिती करून राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांना ४५ हजार लिटरपेक्षा अधिक पुरवठा केला.त्याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरोना वॉरीयर्सना मास्क,चष्मे,हँडग्लोज देऊन मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये निर्जन्तुकीकरण औषध फवारणी २ ते ३ वेळा करण्यात आली असुन गरजेनुसार वाढवण्यात येत आहे.मतदारसंघाच्याच नव्हे तर राज्याच्याही आरोग्य विभागाला बळकटी देण्याचे काम आ.रोहित पवार यांनी केले आहे.भुमीपुत्रांना केलेल्या मदतीच्या आवाहनाने देखील अनेक गरजुंची भुक भागली आहे.केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्षात क्रुतीतुन करून दाखवणाऱ्या  आ.रोहित पवारांच्या कार्यपद्धतीने प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.