रमजान महिना व ईद होईपर्यंत कापड दुकान, शॉपिंग सेंटरला परवानगी देवू नये - खमरुल ईमान
बीड दि.3 ( सिटीझन ) देशात आणि जगात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन सूध्दा चांगले काम करत आहेत. आता रमजान महिना व ईदपर्यंत कापड दुकान व इतर शॉपिंग सेंटरला प्रशासनाने परवानगी देवू नये अशी मागणी अलहिलाल टाईम्सचे संपादक खमरुल ईमान यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बीड जिल्हा, शहरातील परिस्थिति खुप चांगली आहे. सध्या पवित्र रमजान महिना चालू आहे. व सर्व मुस्लिम बांधव हे आप - आपल्या घरी नमाज पठन, रोजा, तरावीह अदा करतायत. त्यांचे सहकार्य प्रशासना सोबत आहे. परंतु या परिस्थिति या रमजान महिनात ईद निमित्ताने जर बीड जिल्हा/ शहरामधे कापड दुकान बुट चप्पल शॉपिंग सेंटर ,कॉस्मेटिक ,बांगड्या ,ची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास या दुकानात मुस्लिम समाज बांधवांची गर्दी होऊ शकते व त्या मुळे सोशल डिस्टेंटसिंग (Social distancing ) राहणार नाही त्याचे पालन होणार नाही व गर्दीत एखादा कोरोना बाधीत रुग्ण असल्यास बीड शहर/जिल्हा आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण बहुतेक रूग्ण असे आहेत की त्यांना लक्षणे दिसत नाही परंतु ते पॉझिटीव्ह निघु शकतात.रमजान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येईल परंतु एकदा गेलेले जिवन पुन्हा येणार नाही म्हणून जनतेच्या व देशाच्या हीता साठी रमजान ईद होई पर्यन्त बीड जिल्हा/ शहरातील वरील नमुद केलेली दुकाने यांना चालु ठेवण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य राखुन परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी अलहिलाल टाईम्सचे संपादक मोहम्मद खमरुल ईमान खान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनात केली आहे.
Add new comment