बीड जिल्ह्यात कोरोना झिरो , आष्टीच्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह - डॉ.थोरात
बीड दि.23 ( सिटीझन) आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्तावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक।थोरात यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. नागरिकांनी अजूनही सर्व नियम पाळावेत आणि सुरक्षित राहावे असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.
पहिल्या पेशंटमुळे जिल्हा कोरोनाच्या यादीत आला होता मात्र आज त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आज यश आले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोना बाधित रुग्णावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्या पेंशटचा पहिला सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यांनतर त्या रुग्णाचे स्वब पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. आजपर्यंत 170 जणांचे स्वब तपासणीला पाठविण्यात आले. त्यापैकी सर्वच्या सर्व 170 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र नागरिकांनी अजूनही सुरक्षित राहणे आवश्यक आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे. सर्व नियम पाळावेत आणि सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Add new comment