बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑर्डर शिवाय कोणताही बदल नाही - रेखावार
बीड जिल्हा लॉकडाऊनच, बदल नाही
बीड दि.20 ( सिटीझन ) राज्य सरकारने दि.17 एप्रिलच्या अधिसूचनेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमात कसलेही बदल सध्या तरी झालेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑर्डर शिवाय कोणताही बदल होणार नाही असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दि.20 एप्रिल रोजी सकाळी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दि.20 एप्रिल नंतर लॉकडाऊनमध्ये मोठी सूट मिळेल अशी चर्चा होती. जीवनावश्यक वस्तूंसह इतर काही व्यवसाय खुली ठेवण्यास जास्त वेळ सूट मिळू शकते अशीही चर्चा होती. काल रात्री यासंदर्भात जिल्हाधिकारी काही नवीन आदेश काढतील असे नागरिकांना वाटले होते. त्याचबरोबर राज्य सरकारनेही दि.20 एप्रिल नंतर काही प्रमाणात सूट देण्यात येईल मात्र जिल्ह्याच्या सीमा बंदच राहतील असे स्पष्ट केले होते. त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. राज्य सरकारने स्पष्ट केल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातही सूट मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालायच्या आदेशा शिवाय कोणताही बदल जिल्ह्यात होणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज सकाळी स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्य सरकारने दि.17 एप्रिलच्या अधिसुचनेत जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे नागरीकांना कोणत्याही स्वरूपाच्या अफवांवर विश्वास न ठेवू नये. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशच महत्वाचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि त्यातील शिथिलता पूर्वी प्रमाणेच राहणार आहे.
Add new comment