अबब ! बीडमध्ये अडीच तासात साडेचारशे वाहने पकडली
बीड ( सिटीझन ):- शहरात आज सकाळी ७ ते ९.३० या अडीच तासांच्या वेळेत संचारबंदी शिथील केलेली असतांना लोक मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहन घेवुन घराबाहेर पडुन रस्त्यावंर गर्दी करत होते. या अडीच तासात पोलिसांनी तब्बल ४४० वाहने पकडली. त्यामध्ये मोटारसायकलींची संख्या जास्त आहे.
बीड जिल्ह्यात संचारबंदी लागु आहे. तरीही नियंमांची पायमल्ली करत नागरीक संचारबंदी शिथीलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर करून विशीष्ट भागात गर्दी करत आहेत. आज सकाळी सकाळ ७ ते ९.३० या संचारबंदी शिथीलीकरण कालावधीत वाहतुक पोलिसांनी अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, शहर पोलिस ठाणे समोर, शिवाजी नगर ठाणे समोर तब्बल ४४० वाहने ताब्यात घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पो.नि.राजीव तळेकर व सर्व वाहतुक पोलिस कर्मचार्यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.
Add new comment