बीड जिल्ह्यात एकाच दिवशी का झाले 28 जणांवर गुन्हे दाखल ?
**
बीड ( सिटीझन ) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियत्रण करण्यासाठी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे दुकाने बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच राज्यात क्रिमीनल प्रोसिजर कोड (crpc) कलम 144 लागू करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए.पोद्दार यांनी जमावबंदी आदेशाचे तसेच जिल्हाधिकारी यांच्या कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना मधील अधिसूचनाचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई चे आदेश ठाणेदार यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
दि.10 एप्रिल रोजी जिल्ह्यात 15 आरोपिताविरुद्द जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणून वेगवेगळे 09 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत. आज दि. 11एप्रिल रोजी पूर्ण जिल्ह्यात 28 आरोपिताविरुद्द जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणून वेगवेगळे 08 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.आजपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 811 आरोपितांविरुध्द 298 गुन्हे भादंवि 188 प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.
Add new comment