बीड जिल्ह्यात छापे ; 20 लाखांची दारू पकडली

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
पथकाने केलेल्या छाप्यात 28 लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड दि. 19 ( प्रतिनिधी ) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून लाखोंचा विदेशी दारू साठा पकडला आहे. मौजे वडगाव आणि साळेगाव ( ता. केज ) येथे काल ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 19 लाख 27 हजारांची 454 बॉक्स दारू आणि 9 लाख 6 हजराच्या दोन गाड्या, मोबाईल असा एकूण 28 लाख 27 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात काल निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथकाने विभागाने गुप्त माहिती नुसार मौजे वडगाव, लाखा सलेगाव रोड ( ता. केज ) छापे टाकून विदेशी मद्य व देशी मद्याचे एकूण 454 बॉक्स जप्त करून ताब्यात घेतले. दोन आरोपी अटक करून ताब्यात घेण्यात आले. यावेळी देशी , विदेशी अशा विविध प्रकारच्या दारूचे 454 बॉक्स ताब्यात घेतले. 3 मोबाईल, टेम्पो क्र. एम एच 46-एफ-2257 व टाटा सुमो क्रमांक एम एच 43 -ए एल -7527 यासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. सुमो गाडी मध्ये दीड लाखाची रोख रक्कम मिळून आली. पंचनामा करून ती ताब्यात घेण्यात आली. जप्त देशी, विदेशी मद्य अंदाजे किंमत रुपये 19 लाख 27 हजार 776 रुपये आहे. त्याचबरोबर रोख रक्कम, जप्त मोबाईल व दोन गाड्या असा 9 लाख 6 हजार रुपयांचे साहित्य असा एकूण 28 लाख 27 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील निरीक्षक श्री. प्रसाद सास्तुरकर , श्री. दीपक परब,तसेच दुय्यम निरीक्षक श्री. योगेश फटांगरे, श्री. बाबासाहेब पंडित यांच्यासह सदाशिव जाधव, सुरेश शेगर, विकास सावंत, दीपक कळंबे, वाहन चालक श्री. देसाई आदींचा सहभाग होता. पथकाच्या मदती करीता स्थानिक स्टाफ अंबाजोगाई येथील दुय्यम निरीक्षक श्री. वाय.एस.वनमारे, उस्मानाबादचे निरीक्षक श्री.मिलींद गरुड यांची स्टाफसह मदत घेण्यात आली.
Add new comment