बीड शहराला आता सहा दिवसाला पाणी उपलब्ध-डॉ योगेश क्षीरसागर

बीड (प्रतिनीधी)
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरेत आणि माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत पुरेशी वाढ झाली आहे त्यामुळे बीड शहराला आता सहा दिवसाला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरसेवक युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे
चालू वर्षी अपुऱ्या पावसामुळे बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणाच्या पाण्याची पातळी व्यवस्थित गेली होती परतीच्या पावसामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीतून माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आले तर काही दिवसापूर्वी बिंदुसरा धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जवळपास एक महिना पुरेल एवढ्यात एवढा पाणीपुरवठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे तर माजलगाव धरणाच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून या धरणातून आता एक वर्ष पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे शहराला आता सहा दिवस आला पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या असून बीड शहरवासीयांना आता सहा दिवसाला पाणी उपलब्ध होईल अशी माहिती नगरसेवक युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे
Add new comment