ना.जयदत्त क्षीरसागरांना आ.मेटेंमुळे मिळू शकते बळ

बीड, (प्रतिनिधी):- शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराचा निर्णय घेतला असून दि.10 ऑक्टोबर रोजी होणार्या मेळाव्यातून यासंदर्भात अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. आ.मेटे यांनी महायुतीच्या प्रचाराचे जाहीर केले आता बीडमधून जयदत्त अण्णांनीही एक पाऊल पुढे यावे. कारण जयदत्त क्षीरसागरांना आ.मेटेंमुळे बळ मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीकडून ना.जयदत्त क्षीरसागर निवडणूकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार असूनही जयदत्त अण्णांच्या बॅनरवर शिवसंग्रामचे नाव किंवा फोटो अजुनही तरी नाहीत. मात्र आ.मेटे यांनी महायुतीच्या प्रचार करण्याचे संकेत दिले असून 10 तारखेला ते अधिकृत भुमिका स्पष्ट करतील. यामाध्यमातून आ.मेटे यांनी अप्रत्यक्षपणे मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता गरज आहे ती जयदत्त अण्णांच्या पुढे येण्याची.ना.क्षीरसागर यांनीही तेवढ्याच सन्मानाने आ.मेटे यांच्यादिशेने एक पाऊल पुढे टाकल्यास नक्कीच त्यांना मोठे बळ मिळेल. त्याचा फायदाही त्यांना होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे
Add new comment