ईडी झाली येडी ; पण एक गोष्ट लक्षात असुदे आपला गडी लय भारी -रोहित पवार

 

जामखेड (प्रतिनिधी) 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील इडीच्या कारवाईविरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. शरद पवार यांच्या विचाराचे वारसदार अशी ओळख झालेल्या रोहीत पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 
      'लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगले खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा.माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा.तसच हे ईडीचे प्रकरण चालू असल्याचा संशय येतो.चांगल खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.अशा प्रकारची टिका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली.
    सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने)महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन,जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे,मदन पाटील,महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत.ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान करण्यात आलेली ही कारवाई सुडबुद्धीने आणि राजकीय दबावापोटी करण्यात आली असल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.रोहित पवार यांची शरद पवार यांच्या विचारांचे वारसदार अशी राज्यभर ओळख झाली आहे. या कारवाईवर युवा नेते रोहित पवार हे काय भुमिका घेणार?याकडे लक्ष लागले आहे.
*जामखेड कर्जत मध्ये निषेध*
     जामखेड तालुका राष्ट्रवादीकडून इडीच्या निषेधार्थ तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी मतदारसंघ प्रमुख प्रा मधूकर तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे अँड हर्षल डोके भगवान गिते अकबर शेख उमर कूरेशी प्रा आहिरे सर राजेंद्र गोरे प्रकाश काळे आदी उपस्थित होते. मतदारसंघातील कर्जत मिरजगाव राशीन आदि ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.