लाइव न्यूज़
जे गाव आज एकत्र येऊन घाम गाळील, त्या गावात दुष्काळ पडणार नाही - डॉ. योगिनी थोरात

केज : सामाजिक क्षेत्रात लोकांनी स्वतः केलेल्या कामाचा दर्जा चांगला आहे. यामुळे आज जे गाव एकत्र येऊन घाम गाळील, त्या गावात दुष्काळ पडणार नाही, असे मत जि. प. सदस्य डॉ. योगिनी थोरात यांनी व्यक्त केले.
केज तालुक्यातील पाथ्रा येथे सत्यमेव जयते 'वॉटर कप' स्पर्धेत श्रमदानाच्या वेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना डॉ थोरात म्हणाल्या की, दुष्काळ परिस्थितीवर मत करण्यासाठी आपण एवढे सर्व जण श्रमदान करीत आहेत. त्यामुळे आपण नक्कीच दुष्काळावर मत करू. विशेष म्हणजे श्रमदानासाठी महिलाही मोठ्या संख्येने आहेत. असे काम प्रत्येक गावात जर झाले तर कोठेच दुष्काळ पडणार नाही. असाही त्या म्हणाल्या. यावेळी गावातील ग्रामस्थां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment