लाइव न्यूज़
कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
Beed Citizen | Updated: July 15, 2018 - 3:21pm
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलीय. उद्यापासून स्वाभिमानीचे दूध दर आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केला आहे. कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत २५ हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सोमवारी १६ जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ उद्या दूध संकलित करणार नाही. त्यामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
एकट्या मुंबईला गोकुळकडून सात लाख लीटर दूध पुरवठा केला जातो. राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेकडून आता मुंबईला जाणारे दूध रोखण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक दिवस संकलन बंद केल्यामुळे गोकुळला सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
Add new comment