लाइव न्यूज़
बळीराजा चिंतेत; दररोज ढग येतात तरीही पाऊस पडेना
Beed Citizen | Updated: July 14, 2018 - 3:24pm
बीड, (प्रतिनिधी):- गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दररोज काळेकुट्ट ढग येतात तरीही पाऊस पडत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अजुनही पुर्ण पेरण्या झाल्या नसुन ज्यांनी लागवड केलेली आहे. ते देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठलेला आहे. पाऊस केंव्हा पडेल या अपेक्षेने बळीराजा अजुनही ढगाकडे टक लावून बसलेला आहे.
बीड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी प्रस्तावित असली तरी आतापर्यंत ४० ते ४५ टक्के पेरणी पुर्ण झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर ज्या शेतकर्यांनी लागवड केलेली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसाने त्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी अजुनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठलेला असुन पेरण्याही पुर्ण झालेल्या नाहीत. दररोज आभाळ येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Add new comment