लाइव न्यूज़
पत्रकारांच्या हितासाठी लढत राहणार -एस.एम. देशमुख
बीड, (प्रतिनिधी):-पत्रकारांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी आपण एक लाखांची नौकरी सोडली. मी मला वैयक्तीक कधीच काही माघत नाही. सरकारला भांडतो तो केवळ पत्रकारांच्या हितासाठी. पत्रकार हल्लाविरोधी कायदा सभागृहात मंजूर झाला. राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर होईल. पत्रकार पेंशनचा लढा देखील आपणच उभा केला होता. त्याला देखील यश आले आहे. हे यश माझे एकट्याचे नाही तर सर्व पत्रकारांचे आहे. मी कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत पडत नाही. ज्याला घ्यावयाचे आहे त्यांने खुशाल घ्यावे. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही मी लढतच राहणार अशी ग्वाही मराठी पत्रकार परिषदेेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिली. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बैठक व सत्कार सभारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर जेष्ट संपादक नामदेवराव क्षीरसागर, आशोक देशमुख, गंमत भंडारी, दिलीप खिस्ती, अनिल महाजन, सुभाष चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, गंमत भंडारी, आशोक देशमुख, दिलीप खिस्ती, जगदीश पिंगळे, अनिल महाजन, सुभाष चौरे, महेश वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला विशाल साळुंके, विलास डोळसे, दत्ता आंबेकर, संपादक राजेंद्र आगवान, सर्वेत्तम गावरस्कर, नरेंद्र कांकरिया,अभिमन्यू घरत विश्वनाथ मानुसमारे, उत्तम हजारे, अनिल मगर, बालाजी तोंडे, दिनेश लिंबेकर, श्रावण जाधव, परमेेश्वर गिते, संतोष जोगदंड, राजेश खराडे, प्रदिप मुळे, प्रदिप राठोड, दत्ता नरनाळे, प्रकाश काळे, नागनाथ सोनटक्के, सय्यद शाकेर, पोपट कोल्हे, अविनाश कदम, जगन्नाथ परजणे, सय्यद अलताफ, जुनेद बागवान, हारिष यादव, सय्यद कौसर, गजानन मुडेगावकर, सुनिल क्षीरसागर, दगडू पुरी, मुकेश झनझणे, केशव कदम, रविंद्र भालेकर, उत्तम ओव्हाळ, उदय जोशी, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, संजय हांगे, सोमनाथ सोनटक्के, संतोष स्वामी सुशील देशमुख प्रचंडसोळंके अनिल अष्ठपुत्रे, लक्ष्मण नरनाळे, किसन माने आदींसह मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे तर सुत्रसंचालन विशाल साळुंके यांनी केले. आभार सय्यद शाकेर यांनी मानले.
Add new comment