लाइव न्यूज़
स्व.व्दारकादासजी मंत्री यांच्या चांगल्या कामाचा आदर्श घ्यावा- नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड, (प्रतिनिधी)ः- बीड नगर पालिकेचे पहिले नगराध्यक्ष माजी खासदार स्व.व्दारकादासजी मंत्री यांनी उत्तम प्रशासन सांभाळून शहराच्या विकासात भरगोस योगदान दिलेले आहे. चांगल्या कामासाठी त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा असून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड नगरीचे पहिले नगराध्यक्ष माजी खासदार स्व.व्दारकादासजी मंत्री यांची आज ३१ वी पुण्यतिथी बीड नगर पालिकेत साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर माजी आ.राजेंद्र जगताप, माजी आ.सुनिल धांडे,सत्यनारायण लाहोटी, विलास बडगे, ऍड.जगन्नाथ औटी, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, बांधकाम सभापती शेख महम्मद खालेद, सभापती मुखीद लाला, माजी नगरसेवक अमृत सारडा, प्रा.किशोर काळे, प्रदिप मंत्री. विष्णूदास बियाणी, नारायणदास मुंदडा, नगरसेवक शुभम धुत, विनोद मुळूक, शेख मतीन, जलीलखान पठाण, गणेश वाघमारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी स्व.मंत्रींजीच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले संयोजक विलास रूईकर यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर म्हणाले की सन १९५२ बीड नगर पालिका अस्तीत्वात आली तेव्हा पहिला मान स्व.मंत्री यांना मिळाला त्यानंतर सलग पंधरा वर्ष ते बीडचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होेते. विरोधकानांही आपलेसे करून योग्य प्रशासन चालवून साधी राहणी उच्च विचार ठेवून त्यांनी काम केले. बीड शहरात सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मीक कार्यात त्यांचा पुढाकार होता. एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते तसेच शहराच्या महत्वाच्या प्रश्नांवर काम करत असतांना त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले. राजकारणातील त्यांची खिलाडूवृत्ती आणि संवाद महत्चाचा होता. विरोधक असतांनाही विकास कामात तेव्हा आडथळे नव्हते मतभेद होते पण मनभेद नव्हते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हा वा बीडकरांनी सातत्याने त्यांचा आदर्श मिळावा यासाठी त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल असे सांगून मंत्रीजीची पुतळा न.प.च्या आवारातील मोकळया जागेत स्थलांतरीत करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, नागरीक, कर्मचारी उपस्थित होते.
Add new comment