बीडमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

बीड, (प्रतिनिधी):- शहरापासुन जवळच असलेल्या एका परिसरातील वेश्याव्यवसायच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक महिला  इतर महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची दिसुन आली. या प्रकरणी सदर महिलेसह त्याठिकाणी असलेल्या अन्य एका तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता एक महिला इतर महिलांच्या आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या राहत्या घरी इतर महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत  असल्याची आढळली. यावेळी त्याठिकाणी अन्य एक जण आढळून आला. या प्रकरणी पथकातील महिला पोलिस नाईक उगले यांच्या फिर्यादीवरुन शोभाबाई नवनाथ भोसले व शेख अमीर शेख समीर यांच्या दोघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि.शितलकुमार बल्लाळ हे करीत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.