लाइव न्यूज़
पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

बीड, (प्रतिनिधी):- पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा सन १९९८ पासुन शासकीय सेवेत घेण्याबाबतचा प्रश्न अद्यापपर्यंत प्रलंबित असुन वेळोवेळी आंदोलने करुनही तो मार्गी न लागल्याने आज जिल्हाकचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी शासकीय सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन, उपोषण केले आहे. संबंधित प्रश्नांवर मंत्रालयात यांच्या फाईल पडून असुन ती प्रक्रिया सुरु असल्याचे पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना सांगण्यात आले होते. मात्र यावर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या या मागणीसाठी आज जिल्हाकचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी डॉ.संजय तांदळे, महारुद्र मोराळे, सय्यद सुजात पापामियॉं, शिवाजी वरकड, एस.एस.युसूफ, देविदास तांदळे, लक्षण आबूज, बाबुराव राठोड आदिंची उपस्थिती होती.
Add new comment