लाइव न्यूज़
शुभकल्याणच्या ठेवीदारांचा जिल्हाकचेरीसमोर ठिय्या

बीड, (प्रतिनिधी):- शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये जवळपास २५ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या प्रकरणात अध्यक्ष व संचालक मंडळाला अटक करुन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी व ठेवीदारांना रक्कम परत करावी या मागणीसाठी ठेवीदारांनी आज जिल्हाकचेरीसमोर ठिया मांडत बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
बीड जिल्ह्यातील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या शाखांमध्ये जवळपास २५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ग्राहकांना गेल्या १८ ते २० महिन्यांपासुन व्याजाची रक्कमही मिळाल्या नाहीत. या मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह सर्व संचालक १ जानेवारी २०१७ पासुन फरार आहेत. मल्टीस्टेटविरुद्ध केज, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, आष्टी, नेकनूर याठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र अद्यापही त्यांना अटक झाली नसुन अध्यक्ष, संचालक मंडळाला अटक करुन त्यांची मालमत्ता जप्त करावी व ठेवीतील रक्कम परत करावी अशी मागणी शंकर राऊत, रामकिसन दहिभाते, अमर शेटे, सोपान लबडे, विजय क्षीरसागर, शेख रफिक, शेख इस्माईल, शेख आदिल यांच्यासह अनेक ठेवीदारांनी केली आहे.
Add new comment