झेंडा काढल्यावरून झालेल्या दगडफेक प्रकरणी २५ जणांविरूध्द गुन्हे दाखल शासकीय वाहनांचेही नुकसान केले

बीड, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील मारफळा फाटा येथे काल झालेल्या दगडफेक आणि शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावातील २५ जणांविरूध्द तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
गेवराई तालुक्यातील तलवाडा पासून जवळच असलेल्या मारफळा फाटा येथे बंजारा समाजाचा झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. पोलिसांनी मध्यस्ती करत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, जमावातील काही जणांनी एकमेकांवर दगडफेक करत शासकीय वाहन क्रं.एम.एच.२३ एफ.१११४ च्या काच्या फोडल्या व मोटारसायकल क्रं.एम.एच.आर६७०० यावरही दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी पोलिस शिपाई सादेक तडवी यांच्या फिर्यादीवरून जमावातील २० ते २५ जणांविरूध्द कलम ३५३, ३३६,३३७, ३३८, १४३,१४७,१४८,१४९,४२७ भादवी कलम ३, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदाप्रमाणे तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शेळके हे करीत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.