लाइव न्यूज़
दोन अपघातात दोन ठार
Beed Citizen | Updated: June 27, 2018 - 4:28pm
बीड, (प्रतिनिधी):- माजलगाव, गेवराईजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली.
माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील अच्युत दादाराव कोलते (वय ५०) हे काल सायंकाळी गावाकडे जात असतांना मोटारसायकल स्लीप झाली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना बीडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात हिरापुरजवळ घडला असुन गणेश महादेव कावळे (वय २७, रा.बोरगाव ता.गेवराई) हे बीडहून गावाकडे जात असतांना त्यांच्या मोटारसायकलला क्रुजर गाडीने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
Add new comment