लाइव न्यूज़
माऊलींची चाकरवाडी म्हणजे धाकटी पंढरी-आ.क्षीरसागर चाकरवाडीतील सप्ताहाची सांगता; हजारो भाविकांची गर्दी
बीड, (प्रतिनिधी):-अध्यात्मिक संपत्ती ही बीडची श्रीमंती आहे. त्यास महाराष्ट्रात तोड नाही. माऊलींच्या दरबारात न बोलवता लोकं येतात. भक्तीची ही ओढ लोह चुंबकाप्रमाणे असुन माऊलींची चाकरवाडी म्हणजे धाकटी पंढरी असल्याचे आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले. दरम्यान चाकरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली.
बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज दुपारी झाली. राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. आ.जयदत्त क्षीरसागर यांनीही भेट देवून माऊलींचा आर्शिवाद घेतला. यावेळी उपस्थितीत भाविकांशी संवाद साधला.
आध्यात्म्याच्या माध्यमातून समाजसेवा घडावी-आ.ठोंबरे
केजच्या आ.संगीताताई ठोंबरे यांनीही चाकरवाडीला भेट देवून माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी आ.ठोंबरे म्हणाल्या, माऊलींच्या समाधीवर नतमस्तक झाले की समाधान प्राप्त होते. वारकरी संत मंडळीच्या आध्यात्मातून माणसाला खूप काही मिळते. आध्यात्माच्या माध्यमातून अशीच समाजसेवा घडावी असेही त्यांनी सांगितले.
Add new comment