लाइव न्यूज़
बीडमध्ये स्काऊट-गाईडचा अनोखा उपक्रम; प्लास्टिक द्या, १ रूपया मिळवा
राज्य आयुक्त संतोष मानूरकरांची खरी कमाई!
बीड, (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी बीड जिल्हयातील स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. २५ जून ते १५ जुलै या काळात जिल्हयातील विद्यार्थी प्लास्टिक पिशव्या गोळा करण्याचे काम करणार आहेत. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या एका प्लास्टिक पिशवीच्या मोबदल्यात त्याला स्काऊट-गाईड कार्यालयाच्या वतीने १ रु . दिला जाणार आहे. दरम्यान राज्य आयुक्त संतोष मानूरकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवला जात असुन पर्यावरणाच्या दृष्टीने केलेली संकल्पना हीच मानुरकरांची ‘खरी कमाई’ आहे.
पर्यावरनाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जनसमर्थन मिळत असून प्लास्टिक बंदीचे महत्व कळावे यासाठी स्काऊट -गाईडने पुढाकार घेतला आहे. बीड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाने एक नवीन योजने आखली असून त्यानुसार बीड जिल्हयातील कब-बुलबुल, स्काऊट -गाईडच्या पथकात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील,शेजारच्या घरातील, परिसरातील वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या गोळा करायच्या आहेत. या पिशव्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील स्काऊट विभागा मध्ये किंवा स्काऊटच्या जिल्हा कार्यालयात जमा कराव्यात. प्रत्येक विद्यार्थ्यांला एका पिशवीसाठी १ रु. मिळणार आहे. . त्याच प्रमाणे खरी कमाईचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या योजनेत बीड जिल्हयातील सर्व स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Add new comment