लाइव न्यूज़
जामखेडमध्ये न.प.कडून स्वच्छता अभियान
Beed Citizen | Updated: June 7, 2018 - 3:21pm
जामखेड, (प्रतिनिधी):-स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्ंगत जामखेड शहर स्वच्छ सूंदर ठेवण्यासाठी शहरातील कचरयाचे ओला सूका असे वर्गीकरण कसे करावे व त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत मुख्याधिकारी विनायक औधकर यांनी सफाई कामगारांना मार्गदर्शनपर माहिती दिली
शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो.
घन कचरा ढिगार्यात फेकण्यामुळे शहराचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. हे कचर्याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणार्या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद कडून उपाय सुचविले गेले . शहराच्या विविध भागातला कचरा गोळा करणे, त्याची ओला कचरा सूका कचरा असे वेगवेगळे करणे घंटागाडीत केलेल्या वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये टाकणे. शहरात कोठेही स्वच्छतेबाबत काम करतांना अडचणी असल्यास तात्काळ संपर्क साधावा स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करू नये अशा सुचना मुख्याधिकारी औंधकर यांनी दिल्या शहरातील वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे. मोठी हॉस्पिटले यांच्याकडे जमणार्या सूई- सिरिंग, कापसाचे बोळे-बँडेज, प्लास्टर, आतडे-गर्भपिशवी, इत्यादी गोष्टींचा जैविक- वैद्यकीय-कचरा या संज्ञेत अंतर्भाव आहे. या कचर्याची हाताळणी व विल्हेवाट संदर्भात १९९८ या कायद्यात स्पष्ट निकष ठरवून निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे हॉस्पीटलला नगरपरिषद कडून सूचना दिल्या आहेत.
यावेळी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात उपनगराध्यक्ष महेश निमोणकर नगरसेवक शामीरभाई सय्यद राजेश वाव्हळ गणेश आजबे कक्षाधिकारी महेंद्र तापकीरे सह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते
Add new comment