काठी नी घोंगड घेऊन धनगर आरक्षणास लढ्यात उतरणार : खा सुप्रिया सुळे
जामखेड,(प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मगाव चौंडी ता जामखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात आ.भरणे मामा,जि प अध्यक्ष विश्वास देवकते,निलेश राऊत,सक्षणा सलगर,वडकुटते, राम, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक यशवंत सेंना धनगर समाज नेते भारत सोन्नर व पदाधिकार्यांच्या वतीने खा.सुप्रिया ताई सुळे यांचा धनगर आरक्षणाची काठी नि घोंगड देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना खा.सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या की तुम्ही दिलेले काठी नि घोंगड घेऊन धनगर आरक्षण लढ्यात सामील होऊन खांद्याला खांदा लावून आरक्षण साठी आपल्या सोबत लढणार आहे हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते परंतु चार वर्षे या सरकारला झाले आहेत तरी देखील या सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही ’लकडी के सीवा मकडी ठीक नही होती ’ या युती सरकारला वठणीवर आणण्यासाठी काठी नि घोंगडी चा हिसका दाखवावा लागेल यासाठी मी आपल्या आरक्षणाच्या लढ्यात उभारणार आहे अहिल्यादेवी होळकरांचे आदर्श सर्व समाजाने आत्मसात केले पाहिजे ज्या मातेने सर्व समाजांच्या लोकहिताचे काम केले आहे अशा मातेला मी वंदन करते असे प्रसंगी खा.सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या अहिल्या जन्मोत्सवाचा कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी यशवंत सेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले
Add new comment