कराड बोलले आता लक्ष धनंजय मुंडेंकडे!

बीड, (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमाप पैसा मागितला म्हणूनच विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतल्याचा गौप्यस्फोट रमेश कराड यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कराड यांनी माघार का घेतली? हे आमच्यासाठी अनाकलनीय असल्याचे सांगुन निवडणुकीनंतर या विषयीचे सत्य समोर येईल असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले होते. निवडणूक होताच कराड यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यामुळे आता धनंजय मुंडे कराडांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रमेश कराड यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांना कारण विचारले असता निवडणुकीनंतर बोलू अशी भुमिका त्यांनी घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या माघार घेण्यामागे काय कारण आहे? याविषयी निवडणुकीनंतरच बोलू असे स्पष्ट केले होते. निवडणुक होताच दुसर्‍याच दिवशी रमेश कराड यांनी मौन सोडत राष्ट्रवादीकडून मोठ्या रक्कमेची मागणी झाल्याने माघार घेतल्याचा गौप्यस्फोट केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरती उघडी पडली आहे. कराडांनी मौन सोडले असले तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या प्रश्‍नी काय बोलतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.