काकू-नाना आघाडीचे आठ तर एम आय एमचे दोन नगरसेवक अपात्र
बीड : येथील शहरातील स्वच्छतेवरून काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षात व टेबल खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केला होता. याप्रकरणी काकु- नाना आघाडीच्या दहा नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता न.प.च्या कौन्सिलमध्येही बसता येणार नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आठ महिन्यापुर्वी शहरातील स्वच्छतेचा प्रशन ऐरणीवर होता. यावेळी काकु-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कक्षामध्ये कचरा टाकला होता. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गटाने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी नगर विकास राज्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे. नगरसेवक पद रद्द झाले असले तरी या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक प्रभाकर पोपळे, सय्यद फारूक अली नुसरत अली, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस अहमद, मोमीन अजहरोद्दीन मोमीन नैमुद्दीन, रंजित बनसोडे या नगरसेवकांचा समावेश आहे.
Add new comment