आर्थिक व्यवहारातून प्लॉटींग एजंटाचे अपहरण
पाटोदा, (प्रतिनिधी):- पाटोदा : पुणे येथील प्लॉटींगच्या व्यवहारातील वादातून चारचाकी वाहनांमधून आलेल्या दहा जणांनी प्लॉटींग एजंटाचे त्याचे मूळ गाव पाचंग्री (ता. पाटोदा) येथून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुनिल बागल असे अपह्रत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी आरती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती पुणे येथे प्लॉटींग खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पुणे येथील सुरेश साळवी यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याने त्याचे बागल यांच्या घरी येणेजाणे होते. कालांतराने दोघात वाद सुरु झाला. सुरेश साळवी हा सतत त्रास देत असल्याची तक्रारही आरती बागल यांनी लोहगाव ठाण्यात दिली होती. नातेवाईकाचे लग्न असल्याने काही दिवसापूर्वी बागल दांपत्य पाचंग्रीला आले होते. दि. १० मे रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक चार वाहनातून सुरेश साऴवी (रा. विश्रांतवाडी, पुणे), विजय पाटील (रा. कोल्हापुर) आणि इतर आठ व्यक्ती आले आणि सुनील बागल यांना बेदम मारहाण करू लागले. यावेळी सुनील यांना सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनतर आलेल्या सर्वांनी सुनील बागल यांना एका वाहनात बसवून सोबत घेऊन गेले. याप्रकरणी सुरेश साळवी, विजय पाटील आणि अनोळखी ८ व्यक्तींवर पाटोदा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Add new comment