जामखेड दुहेरी हत्याकांड : मुख्य सूत्रधाराला अटक उल्हास माने यास १० मे पर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर, (प्रतिनिधी):-जामखेड दूहेरी हत्याकांडाचा कट रचलेल्या त्या तालिमचे मालक वादग्रस्त उल्हास माने उर्ङ्ग टकलू तुपवाला यास जामखेड पोलीसांनी  गजाआड केले. जामखेड दुहेरी हत्याकांड मधील आरोपी उल्हास माने याला  पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार , पोलीस कर्मचारी  अल्ताङ्ग शेख, बढे , अमीन शेख यांच्या टिमने कर्जत तालुक्यातील एका शिवारात आज सकाळी ९.४५ वा पोलिस मित्राचे मदतीने ताब्यात घेतले आहे.  दरम्यान आज न्यायालयासमोर आरोपींना उभे केले असत १० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या पलिकडे त्याची एक तालिम असून तिथे गुंड पोसले जात असल्याची चर्चा आहे.उल्हास माने अहमदनगर येथील सेक्स स्कँडल मधील टकलू तूपवाला म्हणून विख्यात आरोपी आहे. 
जामखेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार उल्हास माने याला अटक केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात सुरूवातीला हल्लेखोर गोविंद गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
उल्हास माने हा भाजपा नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. तो आधी मनसे, त्यानंतर कॉंग्रेस आणि आता भाजपामध्ये आहे. वर्षभरापूर्वी माने याच्या तालमीतील मुलांशी ङ्गलक लावण्याच्या कारणावरून योगेश व राकेशचा वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले असून मानेच्या तालमीतील पैलवानांनीच ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जामखेडमधील बीड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेल्या शनिवारी संध्याकाळी हे हत्याकांड घडले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्ङ्ग रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे त्या हॉटेलमध्ये असताना या दोघांवर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात योगेश आणि राकेश या दोघांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, राकेशने मृत्युपूर्वी गोविंद गायकवाडने हा गोळीबार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गोविंद गायकवाडसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर गोविंद हा शिरुरजवळील मांडवगण ङ्गराटा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले होते. या अटकेच्या वेळीच उल्हास माने याच्या अडचणीत वाढ होणार, असा अंदाज बांधण्यात येत होता.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.