लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात चार हजार युनिटची विज चोरी केज तालुक्यात विज कंपनीच्या पथकाचे छापे
Beed Citizen | Updated: May 4, 2018 - 2:51pm
बीड, (प्रतिनिधी):- विज चोरीचे प्रमाण रोखण्याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून विज वापरली जात आहे. विज कंपनीच्या पथकाने केज तालुक्यात छापे टाकून एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई करत तब्बल ३ हजार ८५३ युनिटची विज चोरी उघड केली आहे. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात विज चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरी रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्यातरी पुर्णपणे विज चोरीला आळा घालण्यात कंपनीला यश आलेले नाही. केज तालुक्यात विज वितरण कंपनीच्या पथकाने पाच ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये विडा येथील अशोक मोहनराव घोरपडे यांनी मीटरमधुन विज न वापरता मिटरला येणार्या इनकमिंग वायरला आऊटगोइंगचे वायर डायरेक्ट जोडून महावितरण कंपनीची ४८२ युनिट विज चोरी केली. शेख समीर अलाउद्दीन यांच्या घरी करण्यात आली असुन त्यांनीही त्याच पद्धतीने ४९० युनिटची विज चोरी केली आहे. तेथीलच राजेंद्र रामभाऊ शिंदे यांनी ८४२ युनिटची तर राजेंद्र निवृत्ती गायकवाड यांनी १४६३ आणि धनराज गोपीनाथ गायकवाड यांनीही ५७६ युनिटची विज चोरी केल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी उपविभागातील पथकाचे सहाय्यक अभियंता प्रदिप मिसाळ यांच्या फिर्यादीवरुन अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.
Add new comment