लाइव न्यूज़
...तर आम्ही शस्त्र हाती घेऊ -उद्धव ठाकरे
Beed Citizen | Updated: April 25, 2018 - 3:00pm
अहमदनगर, (प्रतिनिधी):-गृहराज्यमंत्र्यां नी आपले अधिकार वापरले तर त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर सरकारचं कठीण आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौर्यावर असून त्यांनी हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.
अहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही असा टोला यावेळी त्यांनी भाजपला मारला.तसंच महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणीही केली आहे.
शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की कुणी आमच्यावर हात उचलला तर त्याला ठेचून काढा. गुंड असे मोकाट राहिले तर उद्या तुमच्या घरातही घुसतील. सगळ्यांनी मिळून गुंडगिरी मोडून काढायला हवी, असं त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची कायदाव्यवस्था बिहारपेक्षा वाईट झाली असल्यासारखं वाटत आहे. आमदार कार्डिले यांना गांभीर्याने अटक करणं गरजेचं होतं. अटक झाली मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला यावरुनही संताप व्यक्त केला आहे. तसंच नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असा इशाराही त्यांनी दिला. गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही असा टोला यावेळी त्यांनी भाजपाला मारला.
उद्या वेळ आली आणि कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देताना देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे अशी टीकाही त्यांनी केली. राज्याला वेगळा गृहमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करताना शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत यावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Add new comment