बीडमध्ये विद्यार्थीनीचे अपहरण करुन जबरदस्तीचा प्रयत्न

शेख सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल
बीड, (प्रतिनिधी):- एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण करुन तिला औरंगाबादला पळवून नेल्यानंतर त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दि.२१ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी शेख सोहेल इलियास याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेने खळबळ उडाली असुन शेख सोहेलविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.
बीड शहरातील १७ वर्षीय विद्यार्थीनी येथीलच एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि.२१ एप्रिल रोजी आसेफनगर भागातील शेख सोहेल इलियास या तरुणाने तिला जबरदस्तीने बसस्थानकात येण्यास भाग पाडले. त्याठिकाणी हातरुमाल तिच्या तोंडावर लावून सेंटचा वास घेण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थीनी बेशुद्ध झाली. तरुणाने तिला बसमध्ये बसवून औरंगाबादला पळवून नेले. त्याठिकाणी नातेवाईकाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये ठेवून तिची छेड काढून तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. माझ्याशी लग्न कर असा हट्टही धरला. दि.२२ रोजी सकाळी तरुणीला बीड बसस्थानकावर आणून सोडले अशी फिर्याद पिडीत मुलीने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी शेख सोहेल इलियास याच्याविरुद्ध कलम ३५४ (ड), ३६३, ३६६ (अ), ५०४ भादवी कलम ८, १२ पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एपीआय सलिम पठाण हे करीत आहेत.
 
इंजिनिअर असल्याची बतावणी करुन अनेकींना फसविले
अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण करुन तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात शेख सोहेल इलियास याच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असुन शेख सोहेल हा इंजिनिअर असल्याची बतावणी करत अनेकींना फसविल्याची चर्चा आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.