लाइव न्यूज़
सां.बा.चे कार्यकारी अभियंता नाईकवाडे,शिंदे बेपत्ता
Beed Citizen | Updated: April 24, 2018 - 2:44pm
३०५४ चे प्रलंबित देयक गुत्तेदारांच्या मुळावर
बीड, (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड येथील कार्यकारी अभियंता नाईकवाडे व शिंदे यांच्याकडे जिल्हाभरातील गुत्तेदारांचे लाखो रूपये ३०५४ च्या हेडचे बाकी असताना या गंभीर प्रश्नाकडे दोन्हीही अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने गुत्तेदारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. वेळोवेळी निवेदन देवून ३०५४ च्या हेडबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने सा.बां. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गुत्तेदारांकडून देण्यात आला आहे.
सा.बां. विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना कार्यकारी अभियंता नाईकवाडे व शिंदे हे कार्यालयाकडे ङ्गिरकतच नसल्याने अनेक कंत्राटदारांची बिले रोखली गेली आहेत. सदरील अभियंते बाहेरच असल्याने त्यांची भेट घेणे जिकीरीचे काम झाले आहे. वेळोवेळी ३०५४ च्या हेडबाबत संबंधीत अधिकार्यांना निवेदन दिली. परंतू प्रश्न प्रलंबीत ठेवण्यात आल्याने कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज घेवून ३०५४ च्या माध्यमातून कामे केलेली आहेत. परंतू याचे देयक मंजूर होत नसल्याने पुढे काय करावे? हा प्रश्न कंत्राटदारांमध्ये निर्माण झालेला आहे. मागील तीन वर्षापासून काहींचे बिले प्रलंबीत असून कामे व जॉबवर्क पुर्ण झालेले असतानाही बिले मंजूर होत नसल्याने कंत्राटदार हे हवालदील झाले आहेत. संबंधीत अधिकारी कार्यालयातून नेहमीच बेपत्ता असल्याने आपले म्हणणे कोणासमोर मांडायचे? हाही प्रश्न उपस्थिथ होत आहे. ३०५४ च्या प्रलंबीत बिलेबाबत लवकर निर्णय न घेतल्यास सा.बां. विभागासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कंत्राटदार प्रल्हाद झिरपे, शिवलाल मुळूक, मुरलीधर राऊत आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Add new comment