लाइव न्यूज़
कॉंग्रेसला ६० वर्षात करता आले नाही ते भाजपने करून दाखवले - सलीम जहॉंगिर

बीड, (प्रतिनिधी):- कॉंग्रेसच्या सरकारला ६० वर्षात करता आले नाही ते भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या पाच वर्षांच्या आतच करून दाखवले आहे. बारा वर्षाखालील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणार्या नराधमांना मृत्यूदंड देण्यासंदर्भात केंद्राने अध्यादेश जारी करत त्यास मंजूरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल आणि नराधमांमध्येही कायद्याच्या धाक निर्माण होईल असा विश्वास भाजप नेते तथा जिल्हा विकास सनियंत्रण समिती दिशाचे सदस्य सलीम जहॉंगिर यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी एक मोठा निर्णय झाला आहे. पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बारा वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणातील आरोपीला मृत्युदंड देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश जारी केला. १२ वर्षांखालील चिमुरड्यांवर अत्याचार करणार्यांना ङ्गाशीची शिक्षा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिमुरड्यांवर बलात्कार करणार्यांना ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत होती. जम्मू काश्मीरमधील कठूआ , उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील घटनानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कठूआ येथील आठ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने माणुसकीला काळिमा ङ्गासली. देशभरात निषेध व्यक्त केला गेला. नराधमांना ङ्गाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत होती. त्यामुळे केन्द्र सरकारने कायद्यात बदल करत बलात्कार्यांना मृत्यूदंड देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. कॉंग्रेस सरकारला सत्तेतील ६० वर्षात जे करता आले नाही ते भाजपच्या मोदी सरकारने पाच वर्षांच्या आतच करून दाखवले आहे. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतरही कॉंग्रेसने कायद्यात बदल केला नाही मात्र कठूआ , उन्नाव येथील घटनेनंतर मात्र भाजपच्यासरकारने सदरील घटनांचा गांभिर्यपूर्वक विचार करत पीडितांना न्याय देण्याचा हेतूने आणि भविष्यात अशा घटना घडू नये , निर्भया - कठूआ - उन्नाव सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून थेट पोस्को कायद्यात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशातच तर नव्हे तर जगात या निर्णयाचे स्वागत होऊ लागले असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सलीम जहॉंगिर यांनी आभार मानले आहेत.
Add new comment